Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आठवणींना उजाळा देत तब्बल ३६ वर्षांनी भेटले वर्गमित्र !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचोली येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ३६ वर्षानंतर कार्यक्रमात एकमेकांची भेट घेतली तेव्हा अनेकांच्या भावना उचंबळून आल्या.

तालुक्यातील चिंचोली येथील सार्वजनिक उच्च माध्यमिक विद्यालयात सन १९८६ च्या इ.१० वीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेह मेळावा आपल्या शालेय जिवनातील भावनिक जुन्या आठवणींना उजळ देत चिंचोली विद्यालयात नुकताच आयोजित करण्यात आला होता. शैक्षणीक कार्यानंतर आपल्या जिवनात शेतकरी , व्यावसायिक उद्योजक , राजकारणी , नोकरीतील शिपाई , लिपिक चालक , वाहक , शिक्षक , अधिकारी अशा विविध क्षेत्रातील काम करणार्‍या माजी विद्यार्थ्यांचा या स्नेहमेळावात उपस्थिती होती. यावेळी याच माजी विद्यार्थ्यांचा वेळेस विद्यालयात ज्यावेळी जे शिक्षक होते त्या शिक्षकांना ही या मेळाव्याला सहभाग नोंदविला होता.त्यामुळे गुरू शिष्यांचा हृद्य मिलाफ येथे दिसून आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सेवानिवृत्त प्रा. जी.बी.सोनवणे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्रा.मोते , प्रा.एम.एच.पाटील ,प्रा.डी.एफ . पाटील , प्रा.जी.एन.साठे , प्रा.एम.के.सोनवणे ,प्रा.सौ.एस.बी.पाटील , चिंचोली विद्यालयाचे प्राचार्य के.एस.पाटील , ग्रंथापाल सुर्यभान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी चिंचोली विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या जवळपास ३५ ते ४० माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद व हितगुज साधतांना एकमेकांना अडीअडचणी सोडविण्यासाठी कायम एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन ही केले.तर ३६ वर्षांनंतर कर्मभूमीचे दर्शन झाल्यानें व एकमेकांच्या भेटीगाठी झाल्याने अनेकांना भारावून आले.

या कार्यक्रमात माजी विद्यार्थी विकास पाटील , प्रदीप बेहेडे , भाऊसाहेब धनगर , प्रदिप बेहेडे , प्रविण मोरे , रविंद्र पाटील , उंटावदचे उमाकांत पाटील , मच्छिंद्रनाथ सोनवणे , डिंगंबर बडगुजर यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. तर शिक्षकांमधुन सेवानिवृत्त प्रा. एम एच पाटील , जी एन साठे , प्रा. आर व्ही मोते , प्रा.डी.एफ पाटील , प्रा.एस.बी. पाटील यांनी विचार मांडले. जी.बी.सोनवणे यांनी अध्यक्षिय भाषणात आपल्या जिवनातील घडलेल्या प्रसंगातील आठवणींना दुजोरा दिला.

यावेळी चिंचोलीचे विकास पाटील, भाऊसाहेब धनगर, प्रवीण मोरे, शिरीष चौधरी, प्रदीप बेहडे, प्रभाकर साळुंखे, मच्छिंद्रनाथ सोनवणे; अनिल मोरे , उत्तम सूर्यवंशी , अरुण सोनवणे , योगराज मोरे , डिगंबर बडगुजर , रविंद्र पाटील , कासारखेडाचे रविंद्र पाटील , संजय पाटील , परशुराम सैंदाणे, डोणगाव येथील रवींद्र पाटील , संजय रघुनाथ पाटील , मुरलीधर हिरे , प्रकाश पाटील , जनार्दन पाटील , प्रभाकर वाघ , सुनील पाटील , मोहरदचे रविंद्र तळेले , भिकन पाटील , नुरखा तडवी, उंटावद चे उमाकांत पवार, उत्तम निकम, रोहिदास पाटील , देविदास पाटील , छन्नु सुतार, घुमावलचे ते नकुल पाटील, डोंबिवली येथून संजय खंबायत, संभाजीनगरचे विजय पाटील, चिंचोलीच्या सौ अरुणा पाटील आदींसह माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या परिवारांसह या स्नेह मेळावाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संजय पाटील तर आभार डिगंबर बडगुजर यांनी मानले.

Exit mobile version