Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फसवणुकीतून परस्पर विकलेला जेसीबी पोलिसांनी केला जप्त

यावल प्रतिनिधी । गुजरात राज्यातुन एका शेतकर्‍याची दिशाभुल व फसवणुक करून भाडेतत्त्वावर देण्याच्या नांवाखाली जेसीबी परस्पर विकण्याचा प्रयत्न यावल पोलिसांनी हाणून पाडला आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की गुजरात राज्यातील शेरपुरा भरूच येथील एका व्यक्तिने शेतीकरी १३ / ११ / २०१९ ते ८/१ /२०२० या काळाच्या दरम्यान नागजीभाई राणाभाई भरवाड (व्यवसाय शेतकरी रा .रामदेव नगर बडोदा) आणि विजयभाई नागजीभाई भरवाड, हरीशभाई नागजीभाई भरवाड (सर्व राहणार रामदेव नगर , बडोदा )यांच्या मालकीचे सुमारे ३२ लाख रुपये किमतीचे जेसीबी खरेदी केले होते. संबधीत व्यक्तीने जेसीबीचे मुळ मालक नागजीभाई भरवाड यांचा विश्‍वास संपादन करून कोरोना संसर्गाच्या काळात जेसीबी हे एका व्यक्तिला ७० हजार रुपये महीन्याने भाडेत्त्वावर देण्याच्या आमिष दाखविले.

दरम्यान, त्याने हे जेसीबी दहा लाख पन्नास हजार रुपयास परस्पर विकुन पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे. यावल पोलीसांना बडोदा गुजरात ,पोलीसाकडुन जेसीबी क्रमांक जी जे०६जे एफ१९०८हे जेसीबीच्या मुळ मालकाची फसवणुक करून परस्पर विक्री करण्यात आल्याची माहीती मोबाईलवर मॅसेज व्दारे प्राप्त झाल्यावर यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ यांनी तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरवुन या तक्रारीची दखल घेत शोधकामास वेग दिला. अखेर आज दिनांक १६ नोव्हेंबर रोजी यावल तालुक्यातील उंटावद गाव शिवारातील उंटावद चिंचोली रस्त्यावरून या गुजरात राज्यातुन शेतकर्‍याची फसवणुक करून विकलेल्या जेसीबीचा शोध लावण्यात यश मिळवले आहे.

Exit mobile version