Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे पिसाळलेल्या डुकराच्या हल्ल्यात तरूण जखमी

yawal newss

यावल (प्रतिनिधी)। येथील शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर डुकराने हल्ला चढवत पायास चावा घेत जखमी केल्याची घटना घडली आहे. त्याला उपचारार्थ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकाश राजु शिंदे (वय-२१) रा. शिवाजीनगर परिसर याला २८ रोजी दुपारच्या ३ ते ४ वाजेच्या सुमारास बाहेर बसले असतांना डाव्या पायाच्या मांडीस पिसाळलेल्या डुकराने अचानक जोरदार चावा घेतल्याने त्या जखमी अवस्थेत यावल च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर प्रथमपचार करण्यात येवुन त्याची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास पुढील उपचारासाठी सायंकाळी जळगाव येथील वैधकीय विद्यालय पाठविण्यात आले आहे. या बाबत त्या तरूणा कोणत्या ठीकाणी वराहाने चावा घेतला याची अधिक माहीती मिळु शकली नाही. यावल शहरातील फालक नगर, आयशा नगर, चांद नगर गणपती नगर या परिसरात मोकाट कुत्रे आणी डुकरांची वाढणारी संख्याही नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी असुन नगरपरिषदेने याचे गांभीर्य लक्षात घेवून दखल घ्यावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

Exit mobile version