Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे प्रधानमंत्री पीक विमाच्या तक्रारी; तहसील कार्यालयात बैठक

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या तक्रारी निकाली काढण्यासंदर्भात आज तहसील कार्यालया प्रभारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांही उपस्थित होते. 

यावल येथील तहसीलच्या प्रशासकीय ईमारतीच्या कार्यालयात प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार, तालुका प्रभारी कृषी अधिकारी एस.बी.शिनारे, कृषी सहाय्यक बी.के.माचले, कृषी पर्यवेक्षक पी.आर.कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत २०१९ ते २०या कालावधीतील प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत लाभार्थ्यांच्या खात्यात शासकीय अनुदानाची कमी रक्कम प्राप्त झाल्याच्या तक्रारी या निकाली काढण्यासंदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आली.

सावखेडा सिम तालुका यावल येथील शिवदास वासुदेव पाटील, डांभुर्णीचे शेतकरी मधुकर बाबाजी नेवे, साकळीचे उमाकांत नामदेव माळी, चिखली येथील रूपाली साळवे, डांभुर्णीचे प्रेमचंद फालक, न्हावीचे तुकाराम नारखेडे व मनवेलच्या कविता पाटील यांनी या बैठकीत अद्यापपर्यंत प्रधानमंत्री फसल विम्याची पुर्ण रक्कम प्राप्त झाली नाही. अशी तक्रारींचे निराकरण करण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरिय समितीच्या बैठकीत संबंधीत सेवा पुरवठा करण्याबाबत सविस्तर तक्रारदार शेतकरी आणी अधिकारी यांच्यात चर्चा झाली. समितीने शेतकऱ्यांच्या पिकविम्याची रक्कम कमी मिळणे बाबतच्या विषयांवर तक्रारी ऐकुन घेतल्यात चर्चेअंती या विषयावर तांत्रीक अडचणीवर कृषी विभाग यावल तालुका यांच्या माध्यमातून विमा कंपनी यांच्याशी संपर्क साधुन या विषयावर तात्काळ तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील यांनी तक्रारदार लाभार्थी शेतकऱ्यांना दिली.

Exit mobile version