Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेली दोन मुले बुडाली

यावल प्रतिनिधी । शहरातील सुदर्शन चित्रमंदिराच्या परिसरातील दोन मुले पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेली असून बुडाले असून यातील एकाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे.

या संदंभात मिळालेली माहीती अशी की , यावल शहरातील या सुर्दशन चित्र मंदीर परिसरात सरस्वती विद्यामंदीर या शाळाजवळ राहणारे दिपक जगदीश शिंपी (वय १२ वर्षे) व गणेश बापु दुसाने (वय१४ वर्ष ) ही मुले काल आपल्या मित्रांसह यावल-भुसावळ मार्गावरील असलेल्या हतनुर पाटबांधारे विभागाच्या पाटात पोहण्यासाठी गेले होते. या पाटचारीत पुर्ण क्षमतेचे पाणी शेत पिकांसाठी सोडण्यात आले आहे. येथेच हे दोन्ही आपल्या दोन मित्रांसह पोहण्यासाठी गेले होते.

त्यातील एक मुलगा हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता तो वाहुन जात असल्याचे पाहुन त्यास वाचविण्यासाठी गणेश बापु दुसाने याने एकास काठीच्या सहाय्याने वाचविले. मात्र तो वाहून गेला. त्याच्या सोबत गणेश बापू दुसाने हा देखील वाहून गेला. त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी मदतीसाठी आरडाओरड केली पण त्यांना मदत मिळु शकली नाही. काल दुपारपासून या दोन्ही मुलांचा शोध घेतला जात होता.

दरम्यान, आज सकाळी यातील दीपक जगदीश शिंपी या मुलाचा मृतदेह आढळून आला असून गणेश बापू दुसानेचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सुदर्शन चित्रमंदिर परिसरावर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version