Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुन्हा खुनाने हादरले यावल : महिलेची क्रूर हत्या !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चितोडा येथील तरूणाच्या हत्येमुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच पुन्हा एकदा तालुका खुनाने हादरला आहे.

काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील चितोडा येथील तरूणाचा खून झाला होता. या प्रकरणी एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज पुन्हा एकदा यावल तालुक्यात खुन झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.

या संदर्भातील प्राथमिक माहितीनुसार, शहरातील परिसरात आज सायंकाळी उशीरा या नजमा खलील काझी ( वय ३५, रा. काजीपुरा) या महिलेवर कुर्‍हाडीने हल्ला करण्यात आला. यात ही महिला गतप्राण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात ही खबर वार्‍यासारखी पसरताच परिसर हादरला आहे. यावल येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषीत केले आहे. यात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

(लाईव्ह ट्रेंडस न्यूजने आताच ही बातमी ब्रेक केली आहे. आम्ही यात लागलीच अपडेट करत आहोत.

Exit mobile version