Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ तरूणासह इतरांवर अ‍ॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा

FIR

यावल प्रतिनिधी । प्रेम प्रकरणातून तरूणाचे घर जाळण्याच्या प्रकाराला कलाटणी मिळाली असून आता संबंधीत तरूणीने त्या तरूणासह कुटुंबियांवर अ‍ॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वृत्त असे की, चुुंचाळे येथे प्रेम प्रकरणातून एका तरूणाने घर जाळण्याचा प्रयत्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच प्रकरणात क्रॉस कंप्लेंट दाखल करण्यात आली आहे. यात चुंचाळे गावातील राहणार्‍या एका तरूणी गावातीलच राहणार्‍या एका तरूणाने मेत्रीपुर्ण संबध ठेवुन वारंवार त्या तरूणीचा आर्थिक व मानसिक छ्ड करून विनयभंग करून जातीवाचक बोलुन शिवीगाळ करून लज्जा वाटेल असे कृत केले म्हणुन यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील चुंचाळे येथे राहणारी २८ वर्षीय तरूणी हे संगमेश्‍वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी पोलीस शिपाई म्हणुन कार्यरत आहे. गावातीलच राहणारा शरद अशोक पाटील यांने फिर्यादी तरूणीशी २०१४ते १८ / १ / २०२१पर्यंत संगमेश्‍वर जिल्हा रत्नागिरी ते चुंचाळे गावात मैत्रीपुर्ण संबंध प्रस्थापीत करून वारंवार फिर्यादी पोलीस शिपाई तरुणी कडील मोबाईल तपासणीसाठी मागतो या कारणावरून फिर्यादी तरूणीस शिवीगाळ , दमदाटी करून धमकी देवुन विनयभंग करून पैशांची मागणी करून मानसिक छळ केला. तसेच तरूणी ही आपल्या मुळ गावी आली असता संशयीत शरद अशोक पाटील यांने व इतर ५ते ७ जणांनी संगनमताने सदर तरूणी शेतात आपल्या आईचा जेवणाचा डबा घेवुन जात असतांना विनयभंग केला असे यात म्हटले आहे.

या अनुषंगाने तरुणीच्या फिर्यादीवरून शरद अशोक पाटील, कल्पना अशोक पाटील , आशा शरद पाटील, बायजाबाई पाटील, जनाबाई पाटील, पुनम स्वप्नील पाटील आणी स्वप्नील पाटील (सर्व राहणार चुंचाळे तालुका यावल) यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार हे करीत आहेत.

Exit mobile version