Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावलसह परिसरात भावपूर्ण वातावरणात दुर्गा विसर्जन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्यात काल रात्री उशीरापर्यंत नवदुर्गा मंडळांनी मूर्ती विसर्जन केले.

शहरातील ४२ तर यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील ६८ अशा ११० सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळा कडून गुरुवारी नवदुर्गेस पारंपारिक वाद्य वृंदाच्या गजरात नृत्य करीत युवा वर्गाने निरोप दिला आहे . गुरूवारी सायंकाळ पासून मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात विसर्जन मिरवणुकीस सुरवात होत, रात्री उशिरापर्यंत नवदुर्गचे शांततेत विसर्जन करण्यात आले.

शहरातील ४२ दुर्गोत्सव मंडळांनी नवदुर्ग उत्सव साजरा केला या सार्वजनिक मंडळांसह तालुक्यातील यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनगाव २३, चुंचाळे ३, चितोडा ३, शिरसाड ५, सावखेडासिम ३, महेलखेडी २, बोरावल खुर्द १, डोंगरकठोरा ४, नायगाव ८, दहिगाव १४ व गिरडगाव १ सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी नवरात्री उत्सवाची आज उत्साहात सांगता केली.

संपुर्ण नवरात्री उत्सव काळात उत्साहात आई दुर्गेची आराधाना, पुजा , गरबा,दांडीया उत्साहात पार पडली. गुरूवारी एकादशी असल्याने काही गावात विसर्जन शुक्रवारी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दुर्गामातेचे विसर्जन शांततेत व उत्साहात व्हावे यासाठी तत्पुर्वी येथील पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य व संबंधित प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती.

विसर्जन मिरवणुकी दरम्यान , शांतता कमिटी सदस्य विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तर, यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर , सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले , पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे , सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे , सहाय्यक फौजदार अजीज शेख, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठान सह सर्व पोलिस कर्मचारी व होमगार्ड बांधवांनी संपुर्ण विसर्जन मिरवणुकीत चोख बंदोबस्त राखला. रात्री उशीरापर्यंत तालुक्यातील मंडळांनी आपापल्या नवदुर्गेच्या मूर्तींचे विसर्जन केले.

Exit mobile version