Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा तापी पात्रात मृत्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे शिवारात तापी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या शेळगाव येथील तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

याबाबत वृत्त असे की, यावल तालुक्यातील अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रात शेळगाव ता. जळगाव येथील अरूण उर्फ बालू शालीक कोळी (वय ३० वर्षे) हा तरूण आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पोहण्यासाठी नदी पात्रात उतरला. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

हा तरूण बराच वेळ तो बाहेर न आल्याचे अंजाळे येथील काही नागरीकांनी पाहीले. त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्याला ही माहिती दिली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले
व शोध कार्यास सुरवात केली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या तरूणाचा मृतदेह शोधण्यास अखेर यश आले. या तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयात केल्यांनतर मयताचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून लक्ष्मन सपकाळे यांच्या खबरीवरून येथील पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version