Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावलच्या मागासवर्गीय वस्तीत नागरी सुविधांची मागणी

yawal magni nivedan

यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मागासवर्गीय वस्ती येथे नागरी सुविधा पुरवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नरेन्द्र नथ्थु शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, येथील सार्वजनिक स्वच्छालय महिला ८ युनिट व पुरुषाचे ७ युनिट असे स्वच्छालय बांधकाम करून उभारलेले आहे. सार्वजनिक शौचालय उभारून फक्त तीन वर्ष झाले असुन या तीन वर्षाच्या कार्यकाळात आमच्या वतीने नगरपालिकेला वारंवार तोंडी सूचना देऊन व अधिकार्‍यांना भेटून सुद्धा कुठलेही सार्वजनिक शौचालयाची साफसफाई आज पावेतो झालेले नाही तसेच त्या स्वच्छालय युनिटच्या बांधकामाची पडझड सुद्धा झालेली आहे. या वस्तीत सर्वत्र दृर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य पसरले असुन कचरा उचलण्यास नगर परिषदची घंटागाडी या वस्तीकडे येत नाही गावात प्रत्येक वाड्यात घंटागाडी फिरते व या वाड्यातच घंटागाडी येत नाही व त्यामुळे येथे घाण्याची साम्राजा निर्माण झालेले आहे
आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा आमच्या वस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे भविष्यात या वस्तीतील लोकांना साथीचे रोग पसरण्याची भिती आहे. तसेच यापुढे शहरातील इतर सार्वजनिक स्वच्छता याची ज्याप्रकारे नियमित साफसफाई केली जाते तशी या स्वच्छतेची सुद्धा साफसफाई नियमित करण्यात यावी. अर्ज दिल्यापासून दहा दिवसात संडासाचे साफसफाई व बांधकाम दुरुस्ती न झाल्यास वडार समाज तर्फे मोर्चा व उपोषण करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची राहील याची नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे. सामाजीक कार्यकर्ता नरेन्द्र नथ्थु शिंदे यांनी यावल नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version