Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केळीची खोडे कापून शेतकर्‍याचे नुकसान : दोघांविरूध्द गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात केळीची खोडे कापण्याच्या घटना घडत असतांना आता यावल परिसरातही याच प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

यावल शिवारातील एका शेतकर्‍याच्या शेतातुन अनधिकृतपणे दोन जणांनी शेतात प्रवेश करून मोठया प्रमाणावर उभ्या केळी पिंकाच्या खोडांना कापुन नुकसान केल्याची घटना घडती आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी निर्मल नथ्यु चोपडे , ( शेतकरी वय २६ वर्ष राहणार महाजन गल्ली यावल ) यांच्या यावल शिवारातील गट क्रमांक८०८मधील शेतातील केळीची खोडे कापून फेकल्याचे दिसून आले. संशयीत आरोपी सागर मानेकर व नामदेव कोळी ( दोन्ही राहणार अट्रावल ) यांनी अनधिकृतपणे घुसुन शेतमालक निर्मल नथ्थु चोपडे यांना शिवीगाळ व दमदाटी करीत शेतातील सुमारे १५० उभ्या केळीची झाडे अर्धवट कापुन दीड लाखाचे नुकसान केले आहे.

याबाबत शेतमालक निर्मल चोपडे यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने संशयीत आरोपींच्या विरूद्ध भादंवि कलम ४४७, ५०६ , ४२७प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेन्द्र पवार करीत आहेत.

Exit mobile version