Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डोंगरकठोर्‍यात खंडेराव महाराजांच्या बारागाड्या उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगरकठोरा येथे खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवात बारागाड्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दि.७ मार्च रोजी खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्ताने बारागाड्या ओढणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. डोंगर कठोरा येथे सुमारे १५० वर्षाची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रेच्या निमित्ताने दि.७ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने मोठया उत्साहात बारागाड्या ओढण्यात आल्या.

या बारागाड्या ओढण्याचे काम भगत नरेंद्र झांबरे यांनी केले. सदरील बारागाड्या ह्या हनुमान मंदिरापासून श्री,खंडेराव महाराज मंदिरापर्यंत तब्बल १ कि.मी पर्यंत भाविक भक्तांनी भरगच्च भरून ओढल्या गेल्या. बारागाड्या ओढण्यापूर्वी वैद्य विजय झोपे यांच्या घरी बसविण्यात आलेले नवरत उठविण्यात आले. त्यानंतर भगताला श्री.खंडेराव महाराज मंदिरात खंडेराव महाराज व सोमबुवा महाराज यांच्या पाय पडण्याकरिता आणण्यात आले.तत्पूर्वी वैद्य प्रकाश उखाजी झोपे यांनी विधिवत व सोम बुवा महाराज यांनी प्रदान केलेल्या बीर-कंगनाने बारा गाड्या भारण्याचे काम केले.भगत खंडेराव महाराज व सोमबुवा महाराज यांच्या पाया पडून आल्यावर भगताला वैद्य कांतीलाल झोपे यांनी बद्दीहुक लावताच बारागाड्या ओढण्यात आल्यात. बद्दी विवेक झांबरे,बगले म्हणून जयंत महेश्री व पंकज झांबरे यांनी काम पहिले.

या कामी प्रभाकर उखाजी झोपे,प्रकाश उखाजी झोपे,विजय चिंधू झोपे,सुनील मुरलीधर झांबरे,कांतीलाल लालचंद झोपे,पंकज प्रकाश झोपे,दिनेश राजेंद्र झोपे,गणेश कांतीलाल झोपे,लुकमान तडवी,प्रमोद पाटील,नेमिनाथ झांबरे,नितीन भिरूड,भगवान लोहार. राहुल आढाळे,अमोल पाटील,पोपट पाटील,विलास झांबरे,चेतन पाटील,मयूर जावळे,ललित शिंपी,युवराज पाटील,रवींद्र बर्‍हाटे,जयंत महेश्री,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील, गावाचे पोलीस पाटील राजरत्न आढाळे, तलाठी वसीम तडवी, ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे यांच्यासह इतरांनी सहकार्य केले.

यात प्रामुख्याने ग्रा.पं सदस्य डॉ.राजेंद्र कुमार झांबरे, मनोहर महाजन,दिलीप तायडे,जुम्मा तडवी,आशा आढाळे,कल्पना राणे,ऐश्वर्या कोलते,कल्पना पाटील,शकीला तडवी,शबनम तडवी,हेमलता जावळे,रबील तडवी,वसीम तडवी,लक्ष्मण भिरूड,जानकीराम पाटील,डॉ.पराग पाटील,यदुनाथ पाटील,सचिन राणे,रत्नाकर चौधरी,लिलाधर पाटील,हेमचंद्र भिरूड,हिरालाल जावळे,पवन राणे,मधुकर पाटील,मनोज झोपे,विनायक पाटील,दिनकर पाटील,रुपेश पाटील,योगेश ठोंबरे,डिगंबर खडसे , विद्याधर सरोदे,गणेश जावळे,बंटी पाटील,खुशाल कोळी, शेखर पाटील,लिलाधर जंगले,गंगाधर तायडे यांच्यासह श्री.खंडेराव महाराज मंदिर ट्रस्ट,महादेव मारोती मंदिर ट्रस्ट तसेच सर्व जातीधर्मातील तरुण वर्ग यांनी सहभाग घेतला.

यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहीफडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक बाविस्कर, पोलीस नाईक किशोर परदेशी, पोलीस.नाईक संदीप सूर्यवंशी,गृह रक्षक दलाचे मयूर तायडे,संजय धनगर,सुनील कोळी,धनराज मोरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

Exit mobile version