Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल ग्रामीण रुग्णालयात सक्षम वैद्यकीय अधिकारी अभावी शवविच्छेदनात अडचण

 

यावल ( प्रतिनीधी) येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व एम.एल.सी. केसेस करीता सक्षम वैद्यकीय अधिकारी कार्यरत नसल्याने गैरसोय होत असल्याने यावल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज पाटील यांनी यावल चे पोलीस निरिक्षक डी. के. परदेशी यांना लेखी निवेदन देवुन पर्यायी मार्ग सुचविले आहे.

 

यावल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज पाटील यांनी यावलचे पोलीस निरिक्षक यांना दिनांक २९  मार्च २०१९ रोजी पाठवलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, यावलच्या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय दाम्यत्यांनी ३१ मार्च २०१९ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला असुन, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जगताप चा देखील ३१ मार्चलाच कार्यमुक्त होण्याचे निर्णय घेतल्याने यावलच्या ग्रामीण रुग्णालयात सध्या एक ही वैद्यकीय अधिकारी कार्यरत नसुन यावल, फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शवविच्छेदन / एम.एल. सी.करण्यासाठी वारंवार चावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले जातात. परन्तु ग्रामीण रुग्णालयात सक्षम वैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत असतात. सध्या फैजपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात वर्ग२चे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. तरी आपल्या स्तरावरून मयताचे मृतदेह शवविच्छेदना साठी न्हावी ग्रामीण रुग्णालयात त्याचे किंवा न्हावी येथे शवविच्छेदन रूम नसल्याने वैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदनासाठी यावल येथे पाचारणा करावी असे विनंती पत्र दिले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version