अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारा डंपर जप्त

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी शिवारातुन विना परवाना अवैध गौण खनिजची चोरटी वाहतुक करणारा डंपर महसुलच्या पथकाने जप्त करून दंडात्मक कार्यवाहीसाठी यावल पोलीस स्थानकात जमा करण्यात आला आहे.

याबाबत महसुल प्रशासनाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार दिनांक १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास साकळी शिवारातील वढोदे प्रगणे यावल क्षेत्रात तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या गस्ती पथकाच्या माध्यमातून धडक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत नायब तहसीलदार आर. डी. पाटील, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, अव्वल कारकुन निशा चव्हाण लियाकत तडवी, विरावली तलाठी यांच्या पथकाला डंपर क्रमांक एमएच १९ झेड८९७५या वाहनातुन वाळुची वाहतुक करतांना आढळुन आले. याबाबत विचारणा केली असता वाहनचालक किरण वसंत धनगर (राहणार कासवे तालुका यावल) याने कासवे येथील राहणारे गुणवंत वसंत बादशाह यांचे मालकीच्या डंपर मध्ये असलेल्या वाळुचा परवाना नसल्याचे सांगीतले. यावेळी डंपर वाहनात विनापरवाना गौण खनिज २ ब्रास वाळुची वाहतुक करतांना दिसुन आले म्हणुन महसुलच्या पथकाने कार्यवाही करीत हा डंपर पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी ताब्यात घेवुन त्यास यावल पोलीस स्टेशनला जमा केले आहे.

Protected Content