Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुपोषण बळीच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी ना. ठाकूरांना वेळ का मिळाला नाही ? : डॉ. कुंदन फेगडे

यावल प्रतिनिधी | महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यावल तालुक्यात पक्षाच्या कार्यक्रमाला आल्या, मात्र त्यांना आसराबारी येथील कुपोषणाने बळी गेलेल्या बाळाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ का मिळाली नाही ? असा खडा सवाल आज भाजप नेते नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी केला आहे. कुपोषणबळी गेलेल्या बालकाच्या कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना मदत प्रदान केल्यानंतर ते बोलत होते.

यावल तालुक्यातील आसराबारी येथील आदिवासी बालकाच्या कुपोषणाने झालेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. आज भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या वेदनांवर फुंकर घातली. त्यांनी सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन कर्तव्याची जाणीव ठेवुन सायंकाळच्या सुमारास आसराबारी या ५० घरांची वस्ती असलेल्या गावाला भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. त्यांनी कुपोषणामुळे मरण पावलेल्या बालकाच्या कुटुंबातील त्याची आई व वडील यांची भेट देवुन त्यांचे सांत्वन व्यक्त करून कुटुंबातील ईतर बालकांची आरोग्य आणी पोषण आहार विषयी सर्वतोपरीने काळ्जी घेण्याच्या मार्गदर्शनपर सुचना दिल्यात.

डॉ. कुंदन फेगडे यांनी या पाड्यावरील लहान बालकांना खाऊ देखील वाटप केले. याप्रसंगी त्यांनी गावातील आदीवासी बांधवांशी बोलतांना सांगीतले की आपल्याशी शक्य होईल ते मदत आपणास करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. प्रशासनाच्या गलथान व भोंगळ कारभारामुळे शासकीय योजना या आदीवासी वस्तीवर न पहोचल्याने कुपोषणामुळे एका आठ महीन्याच्या बाळाचा दुदैवी मृत्यु झाला असुन , या संदर्भात शासनाने अद्याप ही गांभींयाने दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर, कालच राज्याच्या महीला व बालविकास मंत्री ना . यशोमती ठाकूर या आसराबारी या गावापासुन पाच सात किलो मिटर लांब असलेल्या एका कार्यक्रमास उपस्थित राहील्यात. पण तालुक्यात कुपोषणामुळे मरण पावलेल्या गावाला त्यांना भेट देता आली नाही हा प्रकार निंदनीय प्रकार आहे. त्यांना यासाठी वेळ का मिळाली नाही ? असा प्रश्‍न देखील डॉ. कुंदन फेगडे यांनी उपस्थित केला.

दरम्यान यावल दोन दिवसापुर्वी जळगाव येथील एका सामाजीक संस्थेच्या माध्यमातुन आसराबारी गावात घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात ही चार मुलं कुपोषणग्रस्त असल्याचे प्रथम उपचारातुन मुंबई येथील डॉ .राहुल पाटील यांनी सांगीतले असुन, या चार बालकांवर तात्काळ उपचार करणे अत्यंत गरजे असुन, याच दृष्टीकोणातुन डॉ . कुंदन फेगडे यांनी त्या चार बालकांचे मोफत प्रथम उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांच्या सोबत रितेश बारी, भुषण फेगडे, मनोज बारी आदी कार्यकर्ते होते.

Exit mobile version