Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे महाराजस्व अभियानांतर्गत दाखले वाटप

dakhale vatap

यावल प्रतिनिधी । येथे महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत आमदार हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते विद्यार्थी व नागरिकांना दाखले वाटप करण्यात आले.

येथे पंचायत समिती सभागृहात आज महाराजस्व अभियान अंतर्गत दाखले वितरणाचा कार्यक्रम आमदार हरिभाऊ जावळे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर आमदार जावळे यांच्यासह नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता अतुल भालेराव, पंचायत समितीचे सदस्य दीपक पाटील,योगेश भंगाळे,माजी जि. प. सदस्य हर्षल गोविंदा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक तथा नगरसेवक प्रा. मुकेश येवले, डांभुर्णी चे सरपंच पुरुजीत चौधरी, अतुल भालेराव, नगरसेवक शेख असलम शेख नबी, तुषार (मुन्ना ) पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने नागरीकांना विविध प्रकारचे १५७ दाखले वितरित करण्यात आले. प्रास्ताविक मंडळ अधिकारी जे.डी. बंगाळे यांनी केले. यावेळी नगरसेवक अतुल पाटील, तसेच डांभुर्णी चे सरपंच पुरुजीत चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुक्यात दि. १३ पासून पाडळसे,फैजपुर, यावल,व भालोद अशा चार गावांमध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत शिबीराच्या माध्यमातुन सुमारे ११७६ प्रमाणपत्र व दाखले वितरित करण्यात आले आहे. हे अभियान रावेर मतदारसंघात येत्या रविवार (ता. १६ ) पर्यंत व आगामी महिन्यात राबविण्यात येऊन गरजूंना आवश्यक असणारे दाखले घरपोच देण्यासंदर्भात देखील योजना असल्याचे आमदार हरीभाऊ जावळे यांनी सांगितले. सूत्रसंचालन मंडळ अधिकारी जितेंद्र पंजे व तलाठी समीर तडवी यांनी केले.

Exit mobile version