Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थीनीचा विनयभंग करणार्‍याच्या विरोधात गुन्हा

FIR

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील साकळी येथील एका व्यक्तीने यावल पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार त्या गृहस्थाची कन्या ही यावल येथील एका शाळेत नववीत शिकत आहे. आज सकाळी ती आपल्या चार मैत्रीणींसह बस स्थानकावर यावलला जाण्यासाठी उभी असतांना दीपक उर्फ आबा वसंत मराठे याने त्यांची छेडखानी केली.

या मुलींनी सदर बाब आपल्या शिक्षकांना सांगितली. शिक्षकांनी या मुलीच्या वडिलांना सांगितली. त्यांनी या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार साकळी येथील दीपक उर्फ आबा वसंत मराठे याच्या विरोधात यावल पोलीस स्थानकामध्ये भादंवि कलम ३५४ (अ) (२) तसेच पोक्सो कायद्यातील कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version