Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली

यावल,  प्रतिनिधी । राजीव सातव यांच्या रुपात देशातील युवकांना प्रेरित करणारी संस्था आज आपल्यातुन हरपली असून, पक्षात कधी ही भरून न निघणारी ही क्षती असल्याचे मनोगत व्यक्त करून स्व. सातव यांना शोकसंदेश देवुन आज काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली .

कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार व उत्कृष्ट संसदरत्न राजीव सातव यांचे काल पुणे येथे उपचार सुरू असतांना दुखद : निधन झाले.  आज सकाळी त्यांच्या कळमनुरी जिल्हा. हिंगोली गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या या आकाली निधनाने संपुर्ण काँग्रेस पक्ष परिवार दुखाच्या संकटात बुडाला असून, यावल येथे त्यांना आज काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे व इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष कदीर खान , पुंडलीक बारी , अनिल जंजाळे, समाधान सोनवणे, नईम शेख, सकलेन शेख, उस्मान खान यांच्यासह आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित सातव यांना भावपुर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली . यावेळी प्रभाकर अप्पा सोनवणे व भगतसिंग पाटील यांनी स्व. राजीव सातव यांनी केलेल्या सामाजीक व राजकीय जिवन पटलावरील त्यांच्या उल्लेखनिय कार्यांचा गौरव करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Exit mobile version