यावलच्या विकासासाठी सक्षम उमेदवारांना निवडून द्यावे : अतुल पाटील

यावल प्रतिनिधी | आगामी काळात होऊ घातलेल्या पालिका निवडणूकीत शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पैसा,जातपात, धर्म, पक्ष असे राजकारण न करता उच्च शिक्षित, अभ्यासू, सक्षम, दूरदृष्टी असलेल्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता अतुल पाटील यांनी केले आहे. ते आपल्या वाढदिवसा निमित्ता आयोजीत सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलत होते.

येथे बेस्ट फ्रेंड वेल्फेअर तर्फे अतुल वसंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एमके फार्म हाऊसवर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ यावलचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी हे होते. या प्रसंगी अतुल पाटील यांच्या हस्ते केक कापून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे, आदीवासी एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी, पी. ई. पाटील, जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन पाटील, अभय देवरे, मनिष चौधरी, किरण तडवी, माजी नगरसेवक अताउल्ला खान, हकीम खान, अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या सत्काराला उत्तर देतांना अतुल पाटील म्हणाले की, शहराच्या नगर परिषदच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकी मध्ये सन २०५०च्या जनगणनेनुसार प्रत्येक नागरिकास मुबलक पाणी मिळावे म्हणून शेळगाव बॅरेजवरून पाणी घेण्यात येणार असल्याचे नियोजन नगर परिषदच्या वतीने करण्यात आले आहे. लवकरच नगरपालिका निवडणूक होत असून यात यावलकरांनी जात, धर्म असा कोणताही भेद न करता उच्च शिक्षीत, सक्षम आणि जनहिताची कळकळ असणार्‍यांनाच निवडून द्यावे असे आवाहन अतुल पाटील यांनी केले.

या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रा. किरण दुसाने यांनी प्रास्ताविक केले.यावेळी पी.ई. पाटील, डॉ. वानखेडे, चंद्रकांत चौधरी, नगरसेवक सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केलीत . प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश येवले, ऍड. देवकांत पाटील, नगरसेवक आभिमन्यू चौधरी, समीर मोमीन शेख, शेख असलम नबी, डॉ. सोहेल खान, सामाजीक कार्यकर्ते एजाज देशमुख, हाजी मो.फारुख शेख, ,भरत कोळी ,विजय मंदवाडे , जावेद पटेल, युनुस पटेल, नदीम पटेल, उमेश बोरसे, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, गोलू माळी, आशिष पाटील, गणेश जोशी, गणेश महाजन, एम के पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content