Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावलमधील कोचींग क्लासेस सुरू करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । कोरोनामुळे पाच महिन्यांपासून बंद असणारे खासगी कोचींग क्लासेस सुरू करण्यात यावेत अशी मागणी क्लासेसच्या चालकांतर्फे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मागील पाच महीन्यांपासुन बंद असलेल्या तालुक्यातील खाजगी शिकवणी क्लासेस पुर्वरत सुरू करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन टीर्चस असोसिएशनच्या शिष्ट मंडळाच्या वतीने यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना देण्यात आले आहे.

या संदर्भात टीर्चस असोसिएशन यावलच्या वतीने तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की मागील पाच महीन्यांपासुन संपूर्ण देशात कोरोना विषाणुच्या संसर्गाने थैमान घातले आहे. या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या वतीने लॉक डाऊन लावण्यात आला आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. रोजी रोटीचा व उदरनिर्वाहचा प्रश्‍न उद्धभवला असुन शासनाने सर्वत्र दुकाने हॉटेल्स ,सलुन व इतर व्यवसायीकांना आपले व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात येवुन ती सुरू देखील करण्यात आली आहे. मात्र क्लास चालकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, १०वी ते १२ पर्यंत हे बोर्डाचे महत्वाचे वर्ष असुन, काही पालकांच्या आग्रहामुळे आपण आम्हास शासनाच्या अटीशर्तींवर बैठे वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी. कारण ऑनलाईन शिक्षण प्रणाली पासुन अनेक विद्यार्थी हे आर्थिक प्रश्‍ना मुळे शिक्षणापासुन वंचित राहुन नये या करीता आपण शासनाच्या नियमाच्या बंधनानुसार शिकवणी बैठे वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर यावल येथील सुयश क्लासेस, श्री गुरूदत इंग्लीश क्लासेस, श्री व्यास क्लासेस, श्रीदुर्गा क्लासेस, चौधरी क्लासेस आणी माळीज क्लासेस या खासगी कोचींग क्लासेसच्या संचालकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Exit mobile version