Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फलक विटंबना प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील गावातील मुख्य चौकातील महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताच्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शनिवारी रात्री दहा वाजेवाजेचे सुमारास अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच, विटंबना करणार्‍यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन दिले पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोरपुरुषां च्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले.

या प्रसंगी सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सध्या तणाव पूर्ण शांतता असून, चोपडा आणि विविध ठिकाणावर दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांचे सह पोलीसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान शुभेच्छा फलक विटंबना प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलिसांनी शेखर नामदेव अडकमोल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश माळी , भुषण पाटील, वैभव पाटील , रितेश पाटील , योगेश माळी व रूपेश चौधरी यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यांनी संगनमताने दहिगाव गावातील मुख्य चौकात ग्राम पंचायतच्या व्यापारी संकुलनावर लावलेल्या शुभेच्छा फलकावर दिनांक १६ एप्रीलच्या रात्री विटंबना केली व समाजीक तसेच धार्मिक भावना दुखावल्या म्हणुन त्यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दहिगाव गावात तणावपूर्ण शांततेचे वातावरण होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला होता.

Exit mobile version