खोदलेल्या चारीत फसली बस ! : चालकाच्या दक्षतेने टळला अपघात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातोद ते वड्री रस्त्यावर खोदलेल्या चारीत बस फसल्याने बराच काळ येथे गोंधळाचे वातावरण निर्मित झाले.

तालुक्यातील यावल ते सातोद वड्री रस्त्यावर एसटी बस खड्डयात गेल्याने अपघात झाला. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , यावल एस टी आगारातील बस क्रमांक एमएच १४बी टी २७०५ ही बस शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास यावलच्या बसस्थानकावरून वड्री जाण्यासाठी निघाली होती. यानंतर यावल वड्री मार्गावरीला सातोद गावाजवळ ही बस चारीमध्ये फसली. या रस्त्याच्या बाजूनेच बीएसएनएल या कंपनीच्या वतीने केबल दुरूस्ती करीता चारी खोदण्यात आली होती. या चारीचे काम पूर्ण झाले असले तरी ती फक्त वर-वर बुजण्यात आली होती. परिणामी वाहकाला याचा अंदाज आला नाही.

यामुळे या चारीत एसटीची दोन चाके अडकली आणि क्षणार्धात बस येथे अडकून पडली. चालकाने वेळीच दक्षता घेतल्याने मोठा अपघात टळला. या बसमध्ये एकुण २१ प्रवासी प्रवास करीत होते. यात उजव्या बाजुस बसलेल्या प्रवासांना किरकोळ मार लागला असुन इतर कुणालाही अशी दुखापत झाली नाही .

दरम्यान, अपघाताची माहीती मिळताच यावलचे आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन हे आपल्या सहकर्मचार्‍यांच्या सोबत तात्काळ अपघातास्थळी दाखल झाले. त्यांनी दुसर्‍या एसटीच्या सहाय्याने खुड्यात पडलेल्या बसला बाहेर काढले. तर या प्रकारामुळे बराच वेळ परिसरात थोडा गोंधळ उडाला.

Protected Content