Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेच्या बैठकीत बाजार समिती निवडणुकीवर खल !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची महत्वाची बैठक माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावल येथे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती यावलच्या होणार्‍या पंचवार्षिक निवडणूक संदर्भात शिवसेना पक्षा अंतर्गत निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली यावलच्या शेतकी संघाच्या सभागृहात आयोजीत करण्यात आली होती.

या बैठकीत येणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येवुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले, या ठिकाणी उपस्थित शिवसेना पदाधिकारी, सरपंच, सदस्यांनी पक्षातीत जेष्ठ पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून आपले मत व्यक्त केले.निवडणुक लढविण्या बाबत वरिष्ठ पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतली.

यावेळी निवडणुक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पदाधिकार्‍यांना कामाला लागण्याबाबत सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुषार पाटील ( मुन्ना ) , सुभाष साळुंखे भरत चौधरी, सूर्यभान पाटील , गोटू सोनवणे, विनायक पाटील, विकास साळुंखे, विलास अडकमोल, मुबारक तडवी, मोहन कोळी, गजानन कोळी, पराग महाजन, आबा साळुंखे, अण्णा साळुंखे, दिनेश साळुंखे, मनोज धनगर, दीपक कोळी, रहमान तडवी, प्रकाश कोळी, समाधान सोनवणे, प्रताप सोनवणे, आबा पाटील, विश्वास पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पाटील, हरिभाऊ पाटील,नाना पाटील, आशिष झुरकाळे, चोलदास कोळी, भरत चौधरी, गोकुळ कोळी, योगेश साळवे, सोनू पाटील, नथ्थु अडकमोल, मेहबूब तडवी, कल्पेश पाटील, जितू पाटील. यावेळेस सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version