Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात बैठक

yawal adhawa baithak

यावल (प्रतिनिधी) पावसाळ्या पुर्वी नैसर्गीक आपत्ती व्यवस्थपना संदर्भात महत्वाची आढावा बैठक येथील तहसीलदार यांच्या कार्यालयात आज प्रांत आधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत प्रांतधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांना सर्वप्रथम परेश्वराचे स्मरर्ण करून यंदा चांगला पाऊस येवु दे देवा अशी प्रार्थना करून आढावा बैठकीची सुरुवात केली.

या नैसर्गीक आपत्ती बाबतची माहीती देतांना प्रांतधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी दिलेल्या सुचना पुढीलप्रमाणे नदीपात्रात किंवा गावातील गांवठाणात मोठे खड्डे असतील तर ते पावसाच्या पाण्यामुळे भरते व त्यामूळे लहान मुलांच्या जिवाला धोका होवु शकतो, या करीता गावात जाहीर दवंडी देवुन व ग्रामस्थांची बैठक घेवुन सुचना दयाव्यात, गावातील पोहणाऱ्या इसमांची यादी घ्यावी तसेच गावातील महत्वाचे दुरध्वनी क्रमांक सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी, डॉक्टर, तलाठी, अशा व्यक्तिंचा या यादीत समावेश असावा, नदी काठा वरील व पुर्नवसन होवुन देखील गावाखाली केलेले नसलेले अशा लोकांच्या संपर्कात राहण्या बाबत सुचना दयाव्यात, धरणाच्या पाण्याचे विर्सजन सोडत असल्यास गावकऱ्यांना कळवावे जेणे करून दुर्घधटना होणार नाही, गावातील गटारी तुंबणार नाही पाणी साचणार नाही या बाबत पावसाच्या पुर्वीच साफसफाई करावी, साथीरोग उद्धभोवणार नाही या बाबतची दक्षता घ्यावी, दुषीत पाणी झाल्यास यावल भागा करीता चोपडा येथे प्रयोगशाळा ( लॅब) आहे, गावांवार आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, यासाठी यावल तहसील कार्यालय येथे नियंत्रण कक्ष तयार करणे व तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांनी कर्मचारी यांच्या मोबाईल क्रमांकासह याद्या घ्याव्यात अशा विविध विषयांवर या आढावा बैठकीत मार्गदर्शन पर माहिती देण्यात आली.

बैठकीला यांची होती उपस्थिती
या बैठकीला तहसीलदार जितेंद्र कुंवर, निवासी नायब तहसीलदार आर. के.पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, मोर धरणाचे शाखा अधिकारी एस.एस. सैय्यद, पाटबंधारे विभागाचे एस.एच. चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजीत निंबाळकर, आदीवासी विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जे.आय. तडवी, तसेच इतर विभागाचे अधिकारी उपास्थित होते.

Exit mobile version