Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोटारसायकलींची समोरा-समोर धडक; दोन तरूण ठार

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील अकलूद गावानजीक असणार्‍या दुसखेडा फाट्याजवळ दोन मोटारसायकलींची समोरा-समोर धडक होऊन दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील दुसखेडा फाटा येथे सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकली एकमेकांना धडकल्या. यात एमएच १९ पीडी- ७५५८ आणि एमएच १९ डीबी-५१६० क्रमांकांच्या गाड्यांवरील दोन्ही स्वार जबर जखमी झाली. यात पाडळसे (ता. यावल) येथील राजकुमार दिलीप तायडे आणि राहूल अरूण वारूळकर (रा. बेलव्हाय, ता. भुसावळ) यांचा समावेश होता. यात राजकुमार तायडे याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर राहूल वारूळकर याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असतांना त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्थानकाचे कर्मचारी अपघातस्थळी पोहचले. पुढील तपास पीएसआय एम.जे. शेख आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

Exit mobile version