Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजपासून बारावीची परीक्षा : अशी आहे यावल येथील बैठक व्यवस्था !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत असून यातील बैठक व्यवस्थेची माहिती गटशिक्षणाधिकार्‍यांनी जाहीर केली आहे.

आज दिनांक २१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत आहे. तालुक्यात एकूण सात केंद्र असून केंद्रनिहाय परीक्षार्थींची संख्या कंसातील आहे. डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल यावल (६८१) नगरपरिषद संचलित साने गुरुजी उच्च माध्यमिक विद्यालय (५४८) ज्योती विद्यामंदिर सांगवी ( ६१७) चिंचोली माध्यमिक विद्यालय( ३७८) तर फैजपूर येथील डी एन कॉलेज (६१७) मौलाना अबुल कलाम हायस्कूल फैजपूर (५१०) पी एस एम एस विद्यालय बामणोद तालुका यावल ( २३६) असे तालुक्यातून तीन हजार ५८७ विद्यार्थी परीक्षेत बसणार असल्याची माहिती येथील गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली आहे. परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना केली असल्याचे , गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी सांगितले.

दरम्यान, कॉपी मुक्त वातावरणासाठी जिल्हा पातळीवरील ५ पथकासह दोन तालुका पातळीवरील भरारी पथके तहसीलदार महेश पवार व गट विकास अधिकारी डॉ .मंजुश्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन भरारी पथके राहणार असुन , याशिवाय प्रत्येक परीक्षा केन्द्रावर प्रत्येकी एक असे सात पथकांची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती येथील यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ चावदस धनके यांनी दिली आहे.

Exit mobile version