Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यवतमाळ जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंमलबजावणीची पाहणी ( व्हिडीओ )

यवतमाळ । नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या (पोकरा) माध्यमातून जिल्ह्यात अनेक शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. या योजनांच्या कार्यान्वयनाची पाहणी राज्याचे मृदा विशेषज्ञ भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी केली.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोकरा ही राज्यातील शेतकर्‍यांसाठी खर्‍या अर्थाने संजीवनी ठरली आहे. या माध्यमातून अनेक शेतकर्‍यांना लाभ झालेला आहे. राज्याचे प्रमुख मृदा विशेषज्ज्ञ भाऊसाहेब बर्‍हाटे हे विविध जिल्ह्यांमध्ये या योजनेचे कार्यान्वयन किती यशस्वी प्रकारे होत आहे याची पाहणी करत आहेत. या अनुषंगाने त्यांनी नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरात पाहणी केली.

याच्या अंतर्गत भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी मौजे वेणू खुर्द येथील सौ.अनिता महेश कानडे यांच्या शेतातील शेततळ्याची पाहणी केली. यासोबत त्यांनी लक्ष्मण खरात, नामदेव पवार, दिगंबर पाठारे यांच्या बंदिस्त शेळीपालन; घटकाची पाहणी केली. यानंतर गजानन मस्के व फिरोज खॉ दौलत खॉ यांच्या फळबागेची पाहणी केली. यानंतर पार्वताबाई पाठारे यांच्या स्पिकलरची पाहणी करून मार्गदर्शन केली.

यासोबत माधव वासेकर यांच्या सोयाबीन बीजोत्पादन युनिटची पाहणी करून त्यांनी मार्गदर्शन केली. याच्या सोबतच महागाव तालुक्यातील मौजा भांब येथे भगवान पंडागळे यांच्या ठिबक संचाची पाहणी करण्यात आली. मौजे काळी टे. येथील विकास नरवाडे यांच्या लिंबु बागेची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौर्‍यात भाऊसाहेब बर्‍हाटे यांच्या सोबत पुसद येथील तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड व महागावचे तालुका कृषी अधिकारी व्हि.टी. मुकाडे यांच्यासह के.एस. राठोड, फाळके, के.एस. आडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

खालील व्हिडीओत पहा पहाणी दौर्‍याची चलचित्रे.

Exit mobile version