Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावल येथील युवकांचा प्रवेश

यावल प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्या वाढदिवसानिमित्ताने खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील युवकांनी पक्षात प्रवेश केला असुन त्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

यावल तालुक्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश पोपटराव येवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संधाच्या सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओ बी सी सेलचे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे हे होते तर इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विजय प्रेमचंद पाटील , माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक देशपांडे, राष्ट्रवादीच्या सामाजीक व न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना बोदडे , राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे , अरूण लोखंडे , आरीफ खान, कामराज घारू, बापु जासुद, सारंगधर अडकमोल सर , विजय साळी यांच्यासह आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित होते . यावेळी शहरातील विविध समाजातील ६०तरूणांनी राष्ट्रीय अध्यश खासदार शरद पवार यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजीत पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला . याप्रसंगी विजय पाटील , प्रा . मुकेश येवले यांनी पक्षात प्रवेश केलेल्या युवकांचे स्वागत सत्कार केले . यावेळी पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमास उपस्थितांचे आभार नाना बोदडे यांनी मानले .

Exit mobile version