Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील विठ्ठल मंदिरात कलम ३७० रद्द केल्याचा राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून आनंदोत्सव

yaval 370

यावल प्रतिनिधी । केंद्र सरकारने ३७० व ३५ (ए) कलम रद्द केल्याबद्दल समस्त हिंदुत्ववादी संघटनेतर्फे महाजन गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात आदर्श पद्धतीने ‘घंटानाद व वंदे मातरम्’ म्हणत राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून आनंदोत्सव नुकताच साजरा करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, काशीनाथ बारी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेस सर्वांनी पेढे वाटून तोंड गोड करण्यात आले. हिंदू जनजागृतीचे हर्षद खानविलकर यांनी कश्मीर मधील ३७० आणि ३५ (ए) ही अन्यायकरी कलम हटवल्याने काय लाभ होणार आहे. याविषयी सर्वांना अवगत केले. तसेच एक चिघळत असलेला प्रश्न भगवंताच्या कृपेने राष्ट्रप्रेमी राज्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी सुटला, पण आता आपण सर्वांनी अखंड हिंदू राष्ट्र स्थापन होण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी निलीमा नेवे, राजू पाचपांडे, अजय नेवे, गजु सपकाळे, भैय्या चौधरी, राहुल कोळी, उज्वल कानडे, विक्की धोबी, सचिन अडकमोल, केतन चोपडे, प्रशांत फेगडे, खेमराज करांडे, देवेंद्र महाजन, चेतन भोईटे, आणि मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थितीत होते.

Exit mobile version