Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन

yaval nivedan

यावल प्रतिनिधी । हिंदु जनजागृतीच्या तालुका समितीच्या वतीने आज दि. 24 जुलै रोजी येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांना विविध विषयासंदर्भात निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बकरी ईदमध्ये करोडो हिंदुची श्रध्दा असलेल्या गोमातेची हत्या थांबवावी, देशात अनेक पशू वधस्तंभावर केंद्रे तसेच वाहनातून अनेक वेळा गोवंश वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आले असून, १८ जुन रोजी विकास गोमसाळे व मयुर विभांडीक या गोरक्षकांची धुळे येथे हत्या करण्यात आली होती. तसेच २४ जुन रोजी ठाणे येथे विभागात गोरखक चेतन शर्मा यांचेवर धर्मारंघानी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. याबाबत तिव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची कारावी, तसेच गोवंश हत्या बंद करावे, त्याचबरोबर क्रांतीकारक वि.दा.सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, इयत्ता ७ वीच्या इतिहास व नागरीकशास्त्राच्या पुस्तकात महाराणा प्रताप यांना एकेरी भाषेत उल्लेख करण्यात असून तो तात्काळ दुरूस्त करावा, इयत्ता ६ वीच्या पुस्तकातील चुकीचे नकाशे दुरूस्त करावे, अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणी अ‍ॅड़ संजीव पुनाळेकर यांच्यासह अनेक निष्पाप हिंदुवर दाखल केलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत, हिंदुचे श्रध्दास्थान असलेल्या नागा साधुविषयी लाल कप्तान या चित्रपटात विकृत दृश्य दाखवले असून तो चित्रपटरावर तात्काळ बंदी आणावी, यासह भारतीय सैन्यामधील उच्च पदस्थांच्या भरतीबाबतची मागणी असे विविध मागण्या निवेदनात करण्यात आला आहेत.

यावेळी निवेदन देतांना धिरज भोळे, नानासाहेब कोलते, अमोल पाटील, कुलदिप पाटील, शरद पाटील, प्रविण बडगुजर, डिगंबर बारी, विनोद कुंभार, योगराज करांडे, निलेश लावणे, सचिन मोरे, चेतन भोईटे, माधव पाटील, विशाल येवूल, सचिन कोळी, चंद्रहास सुरवाडे, प्रकाश माळी, बाळु माळी, उदय बारी, क्षिप्रा पुवेकर, रमेश जोगी, हितेंद्र चौधरी आदी उपस्थितीत होते.

Exit mobile version