Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे बकरी ईद उत्साहात

bakari id

यावल प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात आज दि.12 ऑगस्ट रोजी मुस्लीम बांधवांनी बकरी ईद हा पवित्र सण उत्साहाच्या व शांततेच्या वातावरणात साजरा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरातील ईदगाह मैदानावर शहर काझी मौलाना अब्दुल शमीम कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ९:१५ वाजता सामुहिक नमाज पठन करण्यात आले. यावेळी शेकडो मुस्लीम बांधवांनी नमाज पठन केले. याप्रसंगी मौलाना शमीम कादरी कुर्बानी चा अर्थव महत्व बद्दल व देशात भाई चारा राष्ट्रीय एकतेचे संदेश आपल्या प्रवचनातून देण्यात आले.

यावेळी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे, माजी आमदार शिरीष चौधरी, जेष्ठ माजी आमदार रमेश चौधरी, शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान, यावलचे माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, नगरसेवक शेख असलम शेख नबी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार, मा.नगरसेवक गुलाम रसुल हाजी गु. दस्तगीर काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, अनील जंजाळे, अशपाक शाह यांनी ईदगाह मैदानावर उपास्थिती राहुन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

Exit mobile version