Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे न.पा.च्या दोन कुपनलिकांचे काम युद्धपातळीवर पूर्ण

yaval pani

यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदच्या माध्यमातून होणारा पाणी पुरवठा सुरळीत करु, पाणी टंचाईचा सामना करण्याच्या दृष्टीने साठवण तलावाच्या हद्दीमधील दोन कुपणनलिकाचे काम युद्धपातळीवर पुर्ण करण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, शहरातील नागरिकांना पाण्याबाबत दुष्काळाची परिस्थिती जाणवत असतांना, नागरीकांना पिण्याचे पाणी हे मुबलक व सुरळीत करण्यासाठी नगर परिषद मालकीच्या चार जिवंत विहीरींचे काम पुर्णत्वास करण्यात आले आहे. तसेच, शहरातील काही प्रभागामध्ये या विहीरींचे पाणी देण्यास सुरुवात देखील झाली, असल्याची माहीती नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांनी दिली आहे. नगर परिषदच्या माध्यमातुन संपुर्ण शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासु नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातुन तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक पाणी पुरवठा केला जाईल. तसेच उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक प्रा. मुकेश येवले, सामिर मोमीन, नगरसेवक रईस खान, शिवसेने शरद कोळी, दिलीप वाणी, गणेश बारी, सामिरशेठ व नगर परिषदचे पाणी पुरवठा अधिकारी देवरे यांनी तात्काळ युध्दपातळीवर उपाय योजना सुरू केली असुन, लवकरात याचे काम पुर्णत्वाकडे गेल्यास शहरातील युद्ध पातळीवर पाणी पुरवठा होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version