Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विकास निधी खर्चात यावल प्रकल्प कार्यालय राज्यात प्रथम क्रमांकावर !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील आदिवासी विकास विभागार्तंग जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रमाच्या निधी खर्चात जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तथा प्रकल्प अधिकारी यांच्या पाठपुराव्याचे फलीत म्हणुन यावलचे प्रकल्प कार्यालय राज्यात प्रथम क्रमांकावर गेला आहे अशी माहिती प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे दिली आहे.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की जिल्हा वार्षीक योजना ( जिल्हा वार्षीक आदिवासी घटक कार्यक्रम ) अंतर्गत सन२०२३ आणी २०२४ करीता अर्थसंकल्पीय निधी५५ कोटी ९१लाख बजट निधीतुन ३० कोटी३४ लाख रूपयांचा निधी बिडीएस प्रणालीवर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या पैक्की दिनांक ६ नोव्हेंबर २०२३पर्यंत १६ कोटी४३ लाख रूपयांचा निधी बिडीएस प्रणालीवर खर्च झालेला आहे . उपलब्ध निधीशी खर्च झालेल्या निधीची टक्केवारी ही ५४.१७ टक्के आहे . तसेच अर्थसंकल्पीत निधीची खर्चाची टक्केवारी ही २९ .३९ टक्के असुन निधी खर्चा मध्ये जळगाव जिल्ह्याचे यावल प्रकल्प कार्यालय हे महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहीती त्यांनी दिली आहे.

यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन व ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन , महाराष्ट्र राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांच्या सुचना व लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समिती, आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त नाशिक कार्यालय आणि जिल्हा नियोजन समितीच्या सर्व कार्यान्वतीत यंत्रणेच्या अकृष्ट कामामुळे तसेच प्रकल्प अधिकारी अरूण पवार व त्यांचे सर्व अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आदिवासी विकास क्षेत्रासाठी निधी खर्चात यावल प्रकल्प कार्यालय हे महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पहोचले आहे.

जिल्हा वार्षीक योजनेचा निधी कालमर्यादेत खर्च करण्यासाठी नियोजन समितीने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २े२३ असा१०० दिवसाचा कालबंद्ध कार्यक्रम आखला होता. या कालबद्ध कार्यक्रमात प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रीया, कार्यरंभ आदेश व निधी प्राप्त करून खर्च करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेळोवेळी दिल्याने त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजावर गतीमानता मिळाल्याची माहीती प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे.

Exit mobile version