Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत होणाऱ्या पोलीस पाटलांच्या उपोषणाला यावल तालुक्यातून पाठींबा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुंबई येथे होणाऱ्या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस पाटील जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला. याबाबत प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान राज्यातील पोलीस पाटील बांधवांच्या विविध मागण्यांसाठी म.रा.गां.का.पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण व धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पोलीस पाटील यांची सहविचार सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

यावेळी राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पवन चौधरी, पोलीस पाटील सुरेश खैरनार, राजरत्न आढाळे, लक्ष्मण लोखंडे, नरेश मासोळे, प्रफुल्ला चौधरी, युवराज पाटील, ललिता भालेराव, मुक्ता गोसावी, महमूद तडवी, सलीम तडवी, निलेश सोनवणे उपस्थित होते. सदर बैठकीचे नियोजन जिल्हा संघटक अशोक पाटील यांच्या वतीने करण्यात आले. राज्यातील पोलीस पाटील यांच्या काही प्रमुख मागण्या असून अनेक वर्षांपासुन शासन दरबारी प्रलंबीत आहेत परीणामी सदरील मागण्या मान्य होण्यासाठी पोलीस पाटील संघातर्फे मंत्रालयात बैठका, निवेदने, भेटीसाठी पत्रव्यवहारासह लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्यात आला असून देखील अद्यापपर्यंत शासनाने त्यावर योग्य निर्णय घेतला नसल्याने संघटनेने उपोषणाचा मार्ग निवडला असल्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

प्रसंगी पोलीस पाटीलांचे मानधनात वाढ करुन ते दरमहा किमान १८ हजार मिळावे, ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे,निवृत्तीचे वय ६० वर्षावरुन ६५ वर्षापर्यंत करण्यात यावे, निवृत्तीनंतर किमान २५,००,०००/- (पंचवीस लाख रुपये) ठोस रक्कम मिळावी,नुतनिकरण पहिल्या ५ वर्षानंतर पुढे कायमचे बंद करण्यात यावे, गृह व महसुल विभागातीलपद भरतीमध्ये पोलीस पाटील व त्यांच्या वारसांना पात्रतेनुसार आरक्षणाचा लाभ मिळावा,शासनातर्फे पोलीस पाटीलांचा २०,००,०००/-रु. (वीस लाख रुपये) चा विमा उतरवण्यात यावा व त्याचे हप्ते शासनातर्फे भरण्यात यावे, शासनाकडुन पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना मेडिक्लेमचा लाभ मिळावा,प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा ३ हजार मानधना सोबतच मिळावे, पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेल्या व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटीलांना त्यांच्या निवृत्तीकाळा पर्यंत कायम ठेवण्यात यावे त्यांची पदे खंडित करु नये, अपिलांचे निकाल पोलीस पाटीलांच्या बाजुने लागुनही त्यांना पुन्हा पदभार देण्यास दिरगांई केली जाते ती टाळावी व त्यांना तात्काळ पदभार देण्यात यावा या व इतर मागण्यांचे  निवेदन प्रांताधिकारी, कैलास कडलग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यावल, फैजपूर यांना देण्यात आले आहे.

Exit mobile version