Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आक्षेपार्ह फलक लावणार्‍या समाजकंटकांविरूध्द कारवाई करण्याची मागणी (व्हिडीओ)

yaval nivedan

यावल प्रतिनिधी । यावल-रावेर मतदारसंघातील नेत्यांच्या विरूध्द अवमानकारक फलक लावणार्‍यांविरूध्द दोन्ही तालुक्यांमध्ये संताप उसळून आला असून या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

याबाबत वृत्त असे की, काल रात्री आमदार हरीभाऊ जावळे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचा अवमान करणारे फलक यावल आणि रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये लागल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी हे फलक नजरेला पडल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करणे संदर्भात यावल व फैजपूर पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की कोणीतरी अज्ञात इसमाने रावेर-यावल मतदारसंघात हेतुपूर्वक राजकीय व सामाजिक बदनामी करण्याच्या सुडबुद्धीने फलकबाजी करण्यात आली आहे. या ठिकाणी बॅनर लावण्यात आले ते होर्डिंग पटेल आर्ट्स इतरांच्या मालकीचे असून संबंधितांच्या परवानगी शिवाय हे बॅनर लावले गेले आहेत हे बॅनर लावणार यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या पत्रकात करण्यात आलेली आहे. याप्रसंगी हेमराज ऊर्फ बाळू फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, राकेश फेगडे, वेंकटेश बारी, उमेश फेगडे, गोपाळ महाजन, किशोर कुलकर्णी, घारू, लहू पाटील, गोपालसिंह पाटील, दीपक पाटील, किशोर फालक, अतुल भालेराव यांची उपस्थिती होती. या पदाधिकार्‍यांनी यावल पोलिस स्टेशनचे पीएसआय सुनिता कोळपकर यांना निवेदन देऊन संबंधीतांवर कारवाईची मागणी केली आहे.

Exit mobile version