Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोक विद्यालयात यावल तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसा येथील लोकविद्याल्य येथे यावल तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव शैक्षणी कक्षेत्रातील विविध माऱ्यवरांच्या उपस्थित घेण्यात आला.

 

तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थानी ग्राम शिक्षण संस्थाचे अध्यक्ष डॉ.उदय चौधरी हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यावल तालुक्याचे पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी , लोकविद्यालय पाडळसे चे मुख्या.समाधान भोई सर,पर्यवेक्षक आर.टी.चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

कार्यक्रमात सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात यावल या विज्ञानाच्या मध्ये तालुक्यातील २७ शाळांनी सहभाग घेतला असून जवळजवळ २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढीस लागण्यासाठी विविध विषयांवर ते विद्यार्थ्याने आपले सादरीकरण या ठिकाणी केले .यामध्ये अंधश्रद्धा ,मिलेट क्रांती, खाद्य सुरक्षा दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्यसेवेतील सध्याची वर्तमान प्रगती या विषयांचा समावेश होता.  तालुका विज्ञान मंडळाचे प्रमुख तथा यावल तालुका विज्ञान समनवयक  नरेंद्र महाले यांची देखील उपस्थित ती होती. लतिका पाटील,कविता गोहिल, वैशाली इंगळे पाटील ,गणेश जावळे यांनी परीक्षण केले.

 

मुख्याध्यापक एस.आर.भोई  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गटशिक्षण अधिकारी  विश्वनाथ धनके यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना विज्ञानवादी व्हा,कॉपी मुक्त परीक्षा द्या.असा संदेश दिला.  सूत्रसंचालन डॉ नरेंद्र महाले सर आभार प्रदर्शन सचिन भंगाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी भूषण वाघुळदे, मयूर पाटील ,किरण महाले, वैशाली इंगळे, यावल तालुका विज्ञान मंडळ चे सदस्य व तालुक्यातील शिक्षक तसेच लोक विद्यालय पाडळसे येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,बी आर सी चे सर्व विषय तज्ञ यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version