Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून असोसिएशनचे जिल्हाअध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त किनगाव येथे रक्तदान शिबीराचे संपन्न झाले.

किनगाव येथील राम मंदीरात घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी माजी आमदार रमेश चौधरी, श्रीराम मंदिराचे विश्वस्त के.जी.पाटील डॉ.अरूण बियाणी, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजंन, डॉ.वासूदेव सोनवणे, डॉ.आकाश पावरा, सामाजिक कार्येकर्ते डॉ.योगेश पालवे, डॉ.अमजद खानं, डॉ.नदिम सैय्यद, डॉ.काबरा, माजी उपसभापती व विद्यमान सदस्य उमाकांत रामराव पाटील, माजी पं.स.सदस्य व म.सा.का.संचालक प्रंशात भगवान पाटील, माजी ग्रा.प.सदस्य व विद्यमान सरपंच पती संजय सयाजीराव पाटील, इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे सचिव व वि.का.सो.संचालक मनिष पाटील, किनगाव खुर्दचे सरपंच भुषण पाटील, माजी सरपंच व वि.का.सो.चेअरमन टीकाराम मुरलीधर चौधरी, रवि टेलर, ग्रा.प.सदस्य विजय वारे, समीर तडवी यांच्या उपस्थितीत धन्वंतरी पूजन व दिपप्रज्वलाने रक्तदान शिबीरास सूरूवात झाली.

यात प्रथम मेडीकल असोसिएशनचे ता.उपाध्यक्ष मनिष कौठळकर व त्यांच्या पत्नी अश्विनी कौठळकर यांनी रक्तदांन केले. किनगावसह परिसरातील रक्तदाते व केमिस्ट बंधूनीही स्वंयप्रेरणेने रक्तदान केले. यात प्रामुख्याने तरूण मुले,२ तरूणी व १ दिव्यांग बाधंव सरपंच भुषण पाटील पत्रकार मनोज सुकनाथ नेवे, भैय्या दादा, डॉ.काबरा, डॉ.नदिम यांच्यासह ५६ रक्तदात्यांनी रक्तदानं केले. यावेळी रक्तदात्यांना बरडे मेडीकलचे संचालक विलास बरडे यांच्याकडून प्रोटीन पावडचा डबा देण्यात आला.

रक्तदान शिबीरादरम्यान यावल तालुका मेडीकल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा सचिव अनिल जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात केमिस्टच्या विविध विषयांवर येणाऱ्या आगामी आव्हाणांनवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष श्याम वाणी, सेंन्ट्रल झोनचे उपाध्यक्ष ब्रजेश जैन, जिल्हा सह सचिव रूपेश चौधरी, अनिवृद्ध सरोदे, यावल तालुका टायगर क्रिकेट संघाचे प्रायोजक स्वप्निल रडे, जि.कार्यकारिणी सदस्य दिनेश मालू, खालिदभाऊ,सेन्ट्रंल झोन कार्यकारिणी सदस्य सुनिल नेवे, जाबिर खानं, रोहिदास भिरूड जिल्हा कार्येकारीणी सदस्य व अशोक मेडीकलचे संचालक गुलाबराव पाटील, तालुका अध्यक्ष अनिवृद्ध सरोदे, उपाध्यक्ष मनिष कौठळकर, धनंजय अत्तरदे, सचिव संजय चौधरीसह सचिव प्रंशात कासार, कोषाध्यक्ष गजानन पाटील, जनसंपर्क प्रमुख पुरूषोत्तम पाटील, नितीन महाजन, किशोर कोलते, अनिल लढे, छगन चौधरी, महेंन्द्र महाजनं, दत्ता पाटील, राजेश मखिजा, शे.अकसद शे.रिझवान, किशोर जावळे, प्रशांत फेगडे व तालुक्यातील केमिस्ट बाधंव उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी चंदन, गौरव, सागर, लकी, समाधान, भैय्या व सनी या तरूणांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version