Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषी कायद्याला यावल तालुका ॲग्रो डीलर असोशिएशनचा विरोध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  राज्य सरकारच्या प्रस्ताविक कृषी कायद्यांना यावल तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनने विरोध केला असून, याबाबत चे विरोध दर्शविणारे पोस्टकार्ड मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना पोस्टकार्डव्दारे लिहून पाठवुन निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी घोषित केलेल्या व पुढील अधिवेशनात प्रस्तावित असलेल्या कृषी कायद्या मध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी सारखा प्रकार आहे. या कायद्या अंतर्गत एमपीडीए सारख्या झोपडपट्टी गुंड म्हणून त्यात असलेले गुन्हे नोंद होणार असल्याने कृषी विक्रेत्यांनी या कायद्यास प्रचंड विरोध दर्शविला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना.देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना राज्यभरातून पोस्ट कार्ड पाठवून विरोध दर्शवण्यााठी यावल तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे पोस्ट कार्ड लिहून तालुक्यातील कृषी विक्रेते बांधवांनी विरोध दर्शविला.

या कायद्यांना विरोध करण्यासाठी पोस्ट कार्ड मोहिमेनंतर तीन दिवसीय बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती मनोज वायकोळे यांनी दिली. हिवाळी अधिवेशना पूर्वी या कायद्यांबाबत कृषी विक्रेत्यांचे हित लक्षात न घेता कायदा होत असल्यास हिवाळी अधिवेशना वेळी राज्यभरातून सर्व ५० ते ७० हजार कृषी विक्रेते बांधव नागपूर येथे ठिय्या आंदोलन करतील असे माफदा संघटनेच्या वतीने  सांगितले.

यावेळी यावल तालुका ॲग्रो असोसिएशनचे तालुकाध्यक्ष मनोज वायकोळे, उपाध्यक्ष वसंत पाटील, सचिव नारायण भंगाळे, कोषाध्यक्ष प्रशांत शिंदे, प्रशांत पाटील, पवन पाटील, पवन जैन, सुयोग यावलकर, राकेश जैन, बाळू पाटील, प्रमोद कोलते, हेमंत चौधरी, स्वप्नील फालक, सचिन बोरसे, समाधान पाटील, शशिकांत पाटील, भरत मोरे, रवी पाटील, गौरव राणे, राजू भगत, सोपान चौधरी, हर्षल नेमाडे, रवींद्र महाजन, अरुण पाटील, भूषण चौधरी, मोहन इंगळे, सोहम कोळंबे, भरत पाटील, चेतन चौधरी, प्रवीण शिरोळे, उदय साठे, मुकेश चौधरी आदी उपस्थित होते.

Exit mobile version