Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल अभयारण्यातील ७७ अनधिकृत झोपड्या हटविल्या – वनविभागाची कारवाई

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल अभयारण्यातील जामण्या वन क्षेत्रातील लंगडा आंबा परिमंडळ आणि करंजपाणी मधील अनधिकृत ७७ झोपड्या हटवण्यात आल्या असून वन जमीन ताब्यात घेण्यात आली आहे.

येथील अभयारण्य सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकार पाल अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वात यावल अभयारण्यातील जामण्या वन क्षेत्रातील लंगडा आंबा परिमंडळ आणि करंजपाणी मधील अनधिकृत ७७ झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. या कारवाईतून १६६ अनधिकृत अधिक्रमणधारकांचे २६४.३६ हेक्टर वन जमीनीवरील अतिक्रमण निष्काशन करून नियमानुसार वन जमीन ताब्यात घेण्यात आली.

या कारवाईप्रसंगी पोलीस महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं. जळगाव पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, यावल पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांनी मनुष्यबळ आणि संरक्षण उपलब्ध करून दिलं. या कारवाईच्या वेळी यावल अभयारण्य यावल वन विभागमधील वनपाल वनरक्षक तसेच राज्य राखीव दलाचे जवान उपस्थित होते.

या वन क्षेत्रात खोल सलग समतोल चर घेऊन पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली; असल्याची माहिती यावल सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Exit mobile version