Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल पं.स. च्या नूतन इमारतीचे ना. महाजन यांच्याहस्ते होणार भूमिपूजन

यावल प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम दि.१४ दुपारी जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.

या कार्यक्रमास माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ. उज्वलाताई मच्छिंद्र पाटील, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, डॉ.बी.एन.पाटील( जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी), जिल्हा परिषद सदस्या सौ. अरूणाताई रामदास पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, जि.प. सदस्य रवींद सुर्यभान पाटील, सौ.नंदाताई दिलीप सपकाळे आदी मान्यवर उस्थितीत राहणार आहेत.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सौ.पल्लवी पुरुजीत चौधरी, सभापती उमाकांत रामराव पाटील, पंचायत समितीचे गटनेता व प.स. सदस्य शेखर सोपान पाटील, दिपक नामदेव पाटील, पंचायत सामिती सदस्या सौ. कलीमा सायबु तडवी व सरफराज सिकंदर तडवी व प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी केले आहे.

Exit mobile version