Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल राष्ट्रीय लोकअदालत – २७ प्रकरणांचा निपटारा, तीस लाखांची वसुली

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील प्रथमवर्ग न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन संपन्न झाले. त्यास नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात २७ प्रकरणांमध्ये तडजोडसह निपटारा करण्यात येऊन २९ लाख ९२ हजाराची वसुली झाली.

दिवाणी, फौजदारी व दाखल होण्यापूर्वीचे विविध वित्तीय संस्थाचे एकूण १ हजार ८७७ प्रकरण ठेवण्यात आले होते. यातील २७ प्रकरणांमध्ये तडजोड करीत निपटारा करण्यात येऊन २९ लाख ९२ हजाराची वसुली झाली.

यावल येथील प्रथमवर्ग न्यायालयात शनिवारी दिनांक ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली यात पॅनल प्रमुख म्हणून सह दिवाणी न्यायाधीश व्ही.एस.डामरे तर पंच न्यायाधीश म्हणून अॅड.के.डी.सोनवणे, अॅड.डी.आर.बाविस्कर यांनी कामकाज पाहिले.

या पॅनल समोर दिवाणी ७९ फौजदारी १९२ व दाखल होण्यापूर्वीचे १ हजार ६०६ असे एकूण १ हजार ८७७ प्रकरण ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी खटल्यात १३ प्रकरणात तडजोड करून निपटारा करण्यात आला असून १८ लाख ०३ हजार ३४८ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली.

फौजदारी प्रकरणात सात केसेस तडजोडीने निकाली काढण्यात आल्या. त्यात ४ लाख २६ हजार ५९८ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. तर दाखल होण्यापूर्वीचे सात प्रकरण निकाली काढण्यात आले. त्यात ०७ लाख ६५ हजार ५४३ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली.

या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पॅनल समोर ठेवण्यात आलेल्या १ हजार ८७७ पैकी २७ प्रकरणात आपसात तडजोड करुन निपटारा करण्यात येऊन २९ लाख ९२हजार ४८९ रुपयाची वसुली करण्यात आली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी न्यायालयीन अधीक्षक सुनील शुक्ल, सहाय्यक अधीक्षक सी.एम. झोपे, आर.एस.बडगुजर, आर.व्ही.आमोदकर, एस.आर.तडवी, एस.जी सूर्यवंशी, ए.बी.बागुल, डी.ए.गावंडे, एस.ए.ठाकूर, एस.एस.वाघ, जी.एस.लाड, एम.डी.जोशी, एम.एस.सपकाळे यांनी कामकाज पाहिले.

Exit mobile version