Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल नगराध्यक्षांनी केले आ. शिरीष चौधरींचे अभिष्टचिंतन

यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदच्या नगराध्यक्षा नौशाद तडवी यांनी आज यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खिरोदा येथील निवासस्थानी भेट घेवुन त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले.  

येथील नगर परिषदच्या नगराध्यक्षा नौशाद तडवी तसेच आदीवासी समाजाचे युवा सामाजीक कार्यकर्ते मुबारक तडवी यावल हे सोबत होते. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर आणि फैजपुर शहरच्या नगर परिषदसाठी सुमारे पाच कोटी रूपयांची विविध विकासकामांसाठी मंजुर केले असुन त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन यावल नगर परिषदेलाही आपण आपल्या प्रयत्नातुन यावल शहराच्या विकासासाठी विशेष रस्ता अनुदान व वैशिष्टपूर्ण योजना अनुदान अंतर्गत निधी मिळुन द्यावा बाबत विनंती केली व तसे निवेदन सादर केले.

आमदार शिरीष चौधरी यांनी यावल शहरासाठी भरीव निधी देण्याचे सकारात्मक प्रतिसाद व आश्वासन दिले असुन  लवकरच यावल नगर परिषदला निधि उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले आहे .

 

Exit mobile version