Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल नगरपालिकेचे शिलकी अंदाजपत्रक जाहीर

यावल प्रतिनिधि । येथील नगरपालीकेची अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाची बैठक नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यतेखाली व उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या उपस्थीतीत आज पार पडली. यात प्रभारी मुख्याधिकारी आर.एस. लांडे यांनी २२ लाख ६५ हजार ९०० रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले.

येथील नगरपालीकेचा आगामी सन २०१९-२० या वर्षासाठी सादर करावयाच्या अर्थसंकल्पासाठी अंदाज पत्रकाची शिफारीश करण्यासाठी मंगळवारी पालीकेच्या सभागृहात नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यतेखाली अर्थसंकल्पीय अंजादपत्रकावरील चर्चेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक धरून ३६कोटी ९८ लाख ७३ हजार ५९६ रुपये जमा बाजुने दर्शविलेले असून खर्चाच्या बाजुने ३६ कोटी ७६ लाख ७ हजार ६९६ रुपये दर्शविले आहे. २२ लाख ६५ हजार ९०० रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. जमेची दर्शविलेली ३६ कोटी ९८ लाख ७३ हजार ५९६ रुपये रक्कम पालीकेच्या विविध करासह आणि विविध अनुदानातून प्राप्त होणार असल्याचे म्हटले आहे. आगामी वर्षात नगरपालीकेकडून कोणत्या योजनेतून आणि किती रकमेचे विकास कामे केली जातील या बाबतचे कामाचे नाव नमूद करण्यात येत असलेले प्रपत्र ६ व त्यावरील अंदाजीत रकमेचे विवरण प्रपत्र ७ जोडलेले नसल्याने अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक मोघम असल्याचा आरोप सभागृहात चचे्रप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केला क्रिडांगण विकास, नविन वस्तीतील पाण्याच्या टाकीच्या पाईप वितरण, तसेच अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी शासनाकडून मीळत असलेल्या निधीतून अल्पसंख्यांक वस्त्यामधील विकासात्मक कामे, पुरातन वास्तु संवर्धंन अंतर्गत येथील निंबाळकरांच्या किल्याच्या दुरूस्तीसाठी संकल्पात काही एक नमूद नसून अनेक विकासात्मक कामासाठी संकल्पात तरतुदी नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास पाटील यांनी आणून दिल्या असता सत्ताधारी गटाचे नगरसेवक दिपक बेहेडे यांनी त्यास दुजोरा देत पाटील यांनी सुचविलेल्या दुरूस्त्या करण्याची सुचना मांडली.

पाणीपुरवठा तोटयात पाणीपुरवठा योजनेसाठी घरपट्टीतील १५ टक्के रकमेसह पाणीपट्टी, नळजोडणी व अन्य जमा रक्कम एक कोटी ११ लाख ३९ हजार ३५५ रुपये दर्शविलेली असून योजनेवर एक कोटी,७९ लाख ०५ हजार २६१ रुपये खर्च अपेक्षित दर्शविलेला आहे जमा बाजुच्या रकमेपेक्षा खर्चाची बाजु ६६लाख ६५ हजार ९०६ रुपये तुटीची आहे.अन्य करातून ही तुट भरून काढणार असल्याचे नमूद केले आहे. या चर्चेत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, दिपक बेहेडे, मुकेश येवले, शे. असलम शे. नबी यांनी भाग घेतला.

Exit mobile version