Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल शहरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील फॉरेस्ट कॉलनीतून अल्पवयीन मलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरातील फॉरेस्ट कॉलनीत मावशीकडे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे.  शनिवार ४ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत पीडीत मुलीच्या मावशी व मावसा यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक व मैत्रीणींकडे शोधाशोध करूनही मिळून न आल्याने त्यांनी रविवारी ५ जून रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान हे करीत आहे.

Exit mobile version