Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मस्करीतून चाकू हल्ला: एक ठार; परिसर हादरला

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चहा पिताना झालेल्या मस्करीतून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, यावल शहरातील गजबजलेल्या बोरावल गेट परिसरात दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास धनगरवाडा येथील राहणारे प्रभाकर आनंदा धनगर ( वय ५५ वर्ष ) हे चहाच्या स्टॉलवर बसलेले होते. या ठिकाणी उपस्थितांमध्ये चेष्टा मस्करी सुरू होते. यातूनच रामा केशव ढाके (राहणार व्यास नगर, यावल) या व्यक्तीने चेष्टा मस्करी चालु असतांना  त्याच्या हातातील चाकुने प्रभाकर धनगर यांच्यावर ह्ल्ला करीत त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात धनगर हे गंभीर जखमी झाले.

जख्मी अवस्थेत तात्काळ प्रभाकर धनगर यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.            या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान व पोलीस करीत आहे.

दरम्यान याच प्रकरणात रामा ढाके हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे.

Exit mobile version