Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे ‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ अंतर्गत पथनाट्य व्दारे जनजागृती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगर परिषदेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीगच्या माध्यमातून यावल शहरातील शहराच्या मध्यवर्ती भाग तसेच भुसावळ टी पॉईंट येथे यावल नगरपरिषद व आदिवासी मुलींचे वस्तीगृह यावल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत पथनाट्य सादर करण्यात आले.

यात शहरातील नगर परिषद व्दारे राबविण्यात येणार्‍या स्वच्छता संदर्भात महत्व पटवून देण्यात आले व घरातील कचरा सुका व ओला वेगळा करून द्यावा. प्लास्टिक पिशवी मुक्त शहर हगणदारी मुक्त शहर कसे होईल याचे महत्व सांगितले.

सदरचा उपक्रम यावल नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अभियंता सत्यम पाटील,आरोग्य निरीक्षक नितेश चांगरे,शहर समन्वयक स्नेहा रजाने ,मुकादम शेख मोबीन प्रभारी मुकादम दिलीप बारसे व नगर परिषद च्या विभागातील सफाई कर्मचारी व इतर माजी नगरसेवक मनोहर सोनवणे आणी शहरातील विविध क्षेत्रातील समाजसेवक व नागरिकांचा सहभाग होता.

Exit mobile version