Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल काँग्रेस समितीतर्फे पंडित नेहरू यांना अभिवादन

यावल प्रतिनिधी । देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना यावल तालुका काँग्रेस समितीतर्फे अभिवादन करण्यात आले.

आज भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांची जयंती तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे शेतकी संघाच्या कार्यालयात यावल येथे प्रभाकर अप्पा सोनवणे व भगतसिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून साजरी करण्यात आली.

या वेळी शहराध्यक्ष कदीर खान, ता.उपाध्यक्ष हाजी गफफार शाह,युवक जिल्हा उपाध्यक्ष ईमरान पहेलवान,शहउपाध्यक्ष अनिल जंजाळे, आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष रहेमान खाटीक,शहर सरचिटणीस शेख नईम, शेख कलीमोदीन,हुसेन बिल्डर,नासीर भांजा,सलिम गुलज़ार तडवी,अरबाज खाटीक,शारीक भाई आदी कॉग्रेस कमेटीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version