यावल महाविद्यालयात योग शिबिर उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आठव्या जागतिक  योग दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग व श्रीराम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीला योगशिक्षक एन. एस. वैद्य व श्रीराम पाटील (रावेर) यांचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील यांनी बुके व शाल देऊन स्वागत केले. या योग शिबिराची सुरुवात ओमकाराने करण्यात आली. एन एस वैद्य यांनी आसनांचे विविध प्रकार शिकवले. यात उभे राहून करण्याची आसने, बसून करायची आसने, पोटावर झोपून करण्याची आसने, पाठीवर झोपून करायची आसने व इतर आसने प्रात्यक्षिक रूपात शिकवले. कपालभाती, अनुलोम विलोम भामरी इत्यादी प्राणायाम करून घेतले. याप्रसंगी त्यांनी प्राणायामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते पण त्यात नियमितपणा असावा असा विचार व्यक्त केला.

कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. संजय पाटील, डॉ. गणेश रावते, दिनेश क्षीरसागर सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, व यावल गावातील काही नागरिक उपस्थित होते. योग शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. सुधा खराटे, प्रा. मुकेश येवले,  डॉ. आर. डी. पवार, प्रा. एस. आर. गायकवाड, डॉ. एच. जी. भंगाळे, प्रा. संजीव कदम, मिलिंद बोरघडे आदी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content