Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उद्योग समूहाला भेट

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावलच्या रसायनशास्त्र विभागामार्फत विद्यार्थीनींसाठीची एकदिवसीय औद्योगिक सहलीचे न्यू इरा एडिसिव्ह इंडस्ट्रीज वाघोदा तालुका यावल येथे नुकतेच आयोजन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यात उद्योगाची उभारणी कशा प्रकारे करावी, उद्योगाचे नियोजन,उद्योगा साठी लागणारा भांडवल खर्च, उद्योगाची उत्पादकता व उत्पादनाचे वितरणआदी माहिती तसेच कोणकोणते उत्पादन या कंपनीत तयार केले जातात व पॅकिंग कशा पद्धतीने होते. अशी सविस्तर उद्योग संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

यात ईरा उद्योग समूहाचे व्यवस्थापक पारस जैन,लॅबचे नियंत्रण अधिकारी श्रीकांत मोरे, सहाय्यक धनराज कोळी,निर्माण विभागाचे नियंत्रण अधिकारी विलास कुंभार आदींनी आपआपल्या विभागाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. यात उप प्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.डी.पवार यांनी मार्गदर्शन केले. या सहलीमध्ये कु.दिव्या निळे, सानिका सावकारे, मयुरी खंबायत, चारुशीला पाटील आदी विद्यार्थीनी आपला सहभाग नोंदवला.

Exit mobile version