Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित, कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात “शिक्षक दिन” म्हणजेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले. आरंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सर्व गुरुजनांचा गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार केला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. एम डी खैरनार यांनी शिक्षक दिन साजरा करण्यामागील भूमिका विशद केली. प्राचार्य डॉ. सध्या सोनवणे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कर्तृत्वाविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी माळी हिने केले तर आभार गायत्री महाजन हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. ए पी पाटील डॉ.सुधा खराटे डॉ. एस पी कापडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास डॉ. पी. व्ही पावरा, डॉ. एस. जी. भंगाळे, प्रा. मयूर सोनवणे, प्रा. सुभाष कामडी, संतोष ठाकूर व अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version